Indian GDP : चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाची विकासगती 13.5टक्के इतकी : ABP Majha
भारतीय अर्थव्यवस्थेबाबत काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाची विकासगती १३.५ टक्के इतकी आहे. कोरोनाच्या संकटामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचं जाहीर झालेल्या जीडीपीच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालंय. एप्रिल ते जून या तीन महिन्यात विकासदर साडे तेरा टक्के राहिला. गेल्या वर्षी तो २०.१ टक्के होता. रिझर्व्ह बँकेनं पहिल्या तिमाहीत १६. २ टक्के इतक्या विकासदराचा अंदाज वर्तवला होता. पण गेल्या दोन वर्षांतल्या टाळेबंदीमुळे त्याचा अर्थव्यवस्थेवर प्रतिकुल परिणाम झाला होता. या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर अन्नधान्य आणि खनिज तेलाच्या किंमती उच्च पातळीवर पोहोचूनही आर्थिक व्यवहार सुरळीत झाल्यानं विकासगती साडेतेरा टक्के इतकी गाठता आलीय.