Pune Serum Institute पहिली स्वदेशी लस गर्भाशयाच्या कर्करोगावर मात करणं आता होणार शक्य : ABP Majha
भारतात दरवर्षी अनेक महिलांचा गर्भाशयाच्या कर्करोगाने मृत्यू होता.. मात्र आचा या घातक आजारावर मात करणं शक्य होणार आहे... गर्भशयाच्या कर्करोगास प्रतिबंध करणाऱ्या स्वदेशी लशीची पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने निर्मिती केलीय.. सीरम इन्स्टिट्यूटने 'क्वाड्रिव्हॅलेंट ह्युमन पॅपिलोमाव्हायरस' ही स्वदेशी लस विकसित केलीय. गर्भाशयाचा कर्करोग महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणारा आजार आहे. ‘ह्युमन पॅपिलोमाव्हायरस’ या विषाणूपासून हा कर्करोग होतो. ‘क्यूएचपीव्ही’ ही लस ‘क्वाड्रिव्हॅलंट’ या प्रकारातील असून, त्या लशीची अन्य लशींच्या तुलनेत परिणामकारकता चांगली असल्याचे चाचण्यांमधून स्पष्ट झालंय. १५ ते ४४ वर्षे वयोगटातील महिलांना गर्भाशयाचा कर्करोग होण्याच्या आकडेवारीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे सीरमची ही स्वदेशी लस अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ही लस आज लॉन्च होणार असल्याचं समजतंय...