Coronavirus Vaccine | कोरोना लसीच्या दाव्यानंतर मॉडर्ना कंपनीच्या शेअर्समध्ये 39 टक्क्यांनी वाढ

 कोरोनावरील लसीची मानवी चाचणी यशस्वी झाल्याचा दावा अमेरिकेतील मॉडर्ना या खासगी औषधी कंपनीनं केला. या दाव्यानंतर मॉडर्ना कंपनीचे शेअर्स ३९ टक्क्यांनी वधारले... तर, वर्षभरात मॉडर्ना कंपनीच्या शेअर्समध्ये २४० टक्क्यांची वाढ दिसली... तिसऱ्या टप्प्याच्या पहिल्या फेजमध्ये जितक्या व्यक्तींना मॉडर्ना कंपनीनं बनवलेली लस दिली गेली, तितक्यांच्या शरीरात अँटीबॉडी तयार झाल्याचं कंपनीनं सांगितलंय.. कोरोनाच्या लसीची चाचणी तिसऱ्या टप्प्यात असून उर्वरित टप्पेही यशस्वी झाल्यास पुढील जानेवारीपर्यंत ही लस बाजारात आणू असा दावाही मॉडर्ना कंपनीनं केलाय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola