Accident | झारखंडला जाणाऱ्या मजुरांच्या एसटी बसचा यवतमाळमध्ये अपघात; 4 जणांचा मृत्यू तर 22 जण जखमी
Continues below advertisement
लॉकडाऊनमुळे पोटाची खळगी भरू न शकल्यानं मजुरांचं स्थलांतर सुरुच आहे. अशावेळी त्यांच्या अपघातांची मालिकाही सुरुच आहे. औरंगाबादमध्ये घडलेल्या अपघाताची घटना ताजी असतानाच, यवतमाळमध्ये मजुरांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसनं टिप्परला धडक दिल्यानं मोठा अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील 4 जणांचा मृत्यू झाला असून त्यात एसटी ड्रायव्हरचाही समावेश आहे. तर 22 जण जखमी आहेत. यवतमाळच्या आर्णी नजिकच्या कोळवन गावात हा अपघात झाला. सध्या जखमींवर आर्णीच्य गामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही बस मजुरांना घेऊन सोलापुरहून झारखंडच्या दिशेनं निघाली होती.
Continues below advertisement