Franz Beckenbauer Dies : जर्मनीचे फुटबॉलपटू फ्रान्झ बेकेनबाउर यांचं निधन : ABP Majha
Continues below advertisement
फुटबॉल विश्वातील जर्मनीचे फुटबॉलपटू फ्रान्झ बेकेनबाउर यांचं काल निधन झालंय. ते ७८ वर्षांचे होते. तसंच दोन दिवसांपूर्वी मारियो झगालो यांचही निधन झालं. दोन दिवसांत फुटबॉल विश्वातील दोन तारे निखळून पडले. ‘फिफा’च्या पुरस्कार समितीतही बेकेनबाउर यांनी काही काळ काम केले.बेकेनबाउर हे जर्मन फुटबॉलचा चेहरा होते. पश्चिम जर्मनीसाठी बेकेनबाउर १०४ सामने खेळले. कारकीर्दीत १९७४ मध्ये विश्वचषक विजेत्या जर्मन संघाचे ते कर्णधार होते. जर्मनीला स्पर्धेचे यजमानपद मिळावे यासाठी बेकेनबाउर यांनीच २००० मध्ये प्राथमिक निविदा तयार केली होती. त्यानंतर ते या स्पर्धा संयोजन समितीचे एक भाग राहिले होते. बेकेनबाउर यांच्या कारकीर्दीतला हा काळ दुर्दैवी राहिला असला, तरी खेळाडू आणि व्यवस्थापक म्हणून त्यांची कारकीर्द कायमच गौरवशाली राहिली होती
Continues below advertisement