Scotland : स्कॉटलंडच्या ग्लासगो शहरात गणेशोत्सवाची धूम
ब्रिटनचा भाग असलेल्या स्कॉटलंडच्या ग्लासगो शहरात गणेशोत्सवाची धुम पहायला मिळतेय. इथल्या भारतीयांकडून मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय. त्यासाठी गेले अनेक दिवस ढोल- ताशांचा सराव आणि तयारी करण्यात येत होती. त्यानंतर ग्लसगो शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभा यात्रेत ब्रिटनच्याच्या संसद सदस्या एलिसन थेवलीस या देखील सहभागी झाल्या होत्या. या शोभा यात्रेत 200 वाद्यांसह पाच हजार लोक सहभागी झाले होते.