भारत - Taliban पहिली औपचारिक चर्चा Doha मध्ये, भारत विरोधी कारवाया नको भारताचा तालिबानला इशारा
Continues below advertisement
India – Taliban Meet : भारत आणि तालिबानमध्ये पहिली औपचारिक चर्चा संपन्न झाली आहे. दोहा मध्ये झालेल्या या चर्चेला भारताचे कतारमधील राजदूत दीपक मित्तल आणि तालिबानच्या दोहा मधील राजकीय कार्यालयाचे प्रमुख शेर मोहम्मद अब्बास स्तानकझई हे उपस्थित होते. चर्चेत मुख्यत्वे अफगाणिस्तानातील भारतीयांची घरवापसी आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा झाली. अफगाण भूमीचा वापर भारतविरोधी कारवायांसाठी होऊ नये अशा शब्दात भारतानं तालिबानला इशाराही दिलाय. या विषयांवर चर्चेसाठी तालिबान सकारात्मक असल्याचं कळतंय.
Continues below advertisement