इलॉन मस्क यांच्या SpaceX नं रचला इतिहास, पहिल्यांदाच घडवली चार सामान्य लोकांना अंतराळाची सफर

Continues below advertisement

Elon Musk's SpaceX Inspiration 4 : जगप्रसिद्ध अमेरिकन उद्योजक इलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सनं आज इतिहास रचला आहे. कंपनीने पहिल्यांदा चार सामान्य लोकांना अंतराळात पाठवलं आहे. फ्लोरिडामधील नासाच्या कॅनेडी स्पेस रिसर्च सेंटरमधून रॉकेटचं प्रक्षेपण करण्यात आलं. मात्र यावर नियंत्रण स्पेसएक्स ठेवत होती. तीन दिवसांच्या या मोहिमेला 'इंस्पिरेशन फोर' (Inspiration 4) असं नाव देण्यात आलं आहे. तीन दिवस अंतराळात राहिल्यानंतर हे अवकाशयान पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram