Earthquake at Nepal : भूकंपाच्या धक्क्यानं नेपाळ हादरलं !, 72 लोकांचा मृत्यू : ABP Majha

नेपाळमध्ये (Nepal News) शुक्रवारी रात्री उशिरा तीव्र भूकंपानं हाहाकार माजवला. 6.4 रिश्टर स्केलच्या भूकंपानं (Earthquake Updates) नेपाळमध्ये मृत्यूतांडव पाहायला मिळालं. भूकंपात आतापर्यंत 72 लोकांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे अनेकजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुकुम पश्चिम आणि जाजरकोटमध्ये भूकंपामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola