ISKON कडून आज जगभरातील 150 देशांत निदर्शन, Bangladesh मध्ये हिंदूंवर झालेल्या हल्ल्याचा निषेध
Continues below advertisement
ढाका : बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ले आणि अत्याचाराबाबत बांगलादेशचे गृहमंत्री असदुझ्झमन खान म्हणाले की, “पूजा मंडपात या घटना कोणीही घडवून आणल्या असतील, आम्हाला खात्री आहे की आम्ही गुन्हेगारांना लवकरच अटक करू शकू. गुन्हेगार सतत त्यांची ठिकाणे बदलत आहेत आणि इकडे -तिकडे फिरत आहेत, पण आम्ही त्यांना पकडू आणि त्यांनी हे का केले, आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊ आणि तुम्हालाही कळवू. ”बांगलादेशमध्ये कुराणचा कथित अपमान झाल्याच्या अफवेवर दुर्गा शुक्रवारी पूजा पंडल आणि हिंदू मंदिरांवर हल्ले झाले. इस्कॉन मंदिराचीही तोडफोड करण्यात आली. यानंतर देशातील काही भागात हिंसाचार उफाळला आणि हिंदू समाजाची घरे आणि दुकाने लक्ष्य करण्यात आली.
Continues below advertisement