David Beckham at Queen's last Rites : राणीच्या अंत्यदर्शनासाठी बेकहॅम 13 तास रांगेत
इंग्लंडचा माजी कर्णधार डेव्हिड बेकहॅमनं तब्बल तेरा तास रांगेत उभं राहून ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं अंत्यदर्शन घेतलं. सेंट्रल लंडनमधल्या वेस्ट मिनिस्टरमध्ये राणीचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलंय.. आपल्या लाडक्या राणीच्या अंत्यदर्शनासाठी साडेसात लाखांहून अधिक नागरिकांनी रांग लावली होती. त्यात बेकहॅमसारख्या सेलिब्रिटीजचाही समावेश होता. लंडनच्या वेळेनुसार भल्या पहाटे सव्वा दोनच्या सुमारास बेकहॅम रांगेत उभा राहिला होता. त्याला दुपारी तीन वाजून २५ मिनिटांनी राणीच्या अंत्यदर्शनाची संधी मिळाली. बेकहॅमला त्याच्या कारकीर्दीत राणीला भेटण्याची अनेकदा संधी मिळाली होती. त्यामुळं शवपेटीनजिक येताच बेकहॅमचं मन त्या भेटींच्या आठवणींनी दाटून आलं. त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू उभे राहिले. बेकहॅमनं डोळे मिटून राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं अंत्यदर्शन घेतलं