China Virus HMPV | चीनमध्ये नव्या व्हायरसचा हाहा:कार,ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस म्हणजेच HMPVचं थैमान
Continues below advertisement
चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातलं होतं... कोविडमुळे जगभरातील अनेक लोकांचा मृत्यू झाला होता... दरम्यान, आता कोरोनासारख्या आणखी एका व्हायरसने तोंड वर काढलंय...कोरोनानंतर पाच वर्षांनी चीनमध्ये नवा व्हायरस पसरलाय... चीनमध्ये सध्या ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस वेगाने पसरतोय... संपूर्ण देशातील रुग्णालयात रुग्णांची गर्दी पाहायला मिळतेय...शिवाय स्मशानभूमीमध्ये मृतदेहांचा खच पडल्याची माहिती आहे...हा व्हायरस लहान मुलं आणि वृद्धांमध्ये वेगाने पसरत अल्याचा दावा करण्यात येतोय...व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता अधिकाऱ्यांनी पुन्हा मास्क घालण्याचा सल्ला दिलाय...तर योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय...
Continues below advertisement