Coronavirusमुळे जगातील सगळ्यात मोठा मोबाईल शो रद्द | ABP Majha
कोरोना विषाणू संदर्भात मोठी बातमी समोर आलीय. कोरोनामुळे जगातील सगळ्यात मोठा मोबाईल शो रद्द करण्यात आलाय. बार्सिलोनामध्ये २४ ते २७ फेब्रुवारी दरम्यान मोबाईल वर्ल्ड काँग्रेस शो रंगणार होता. मात्र कोरोना विषाणूमुळे अनेक बड्या कंपन्यांनी या शोकडे पाठ फिरवली. या शोमध्ये २०० देशांचे जवळपास १ लाख प्रतिनिधी सहभागी होणार होते.