Pest Control | पेस्ट कंट्रोलनंतर योग्य खबरदारी न घेतल्याने पुण्यात दाम्पत्याचा मृत्यू | ABP Majha
घरात पेस्ट कंट्रोल करणं पुण्यातील दाम्पत्याच्या जीवावर बेतलं आहे. पेस्ट कंट्रोल केल्यानंतर घरात योग्य ती खबरदारी न घेतल्याने दाम्पत्याचा मृत्यू झाला. बिबवेवाडी परिसरातील गणेशविहार सोसायटीमध्ये बुधवारी (12 फेब्रुवारी) ही घटना घडली आहे. अविनाश मजली (वय 64 वर्ष) आणि अपर्णा मजली (वय 54 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत.