Assam Elephant: नवजात पिल्लांसाठी हत्तीणीची धडपड ABP Majha
आसाम मधिल काझीरंगा नॅशनल पार्क मध्ये आलेल्या पर्यटकांची वाट एका हत्तीणीनं तब्बल 2 तासांसाठी अडवली. ही बातमी एखाद्या आक्रमक हत्तीणींची नसून त्या हत्तीणीच्या मातृहृदयाची आहे... नुकत्याच जन्मलेल्या आपल्या पिलाला घेवून या हत्तीणीला रस्ता ओलांडायचा होता. मात्र पिल्लाला नीट चालताही येत नसल्यानं ही हत्तीण पिल्लाच्या कलेनं त्याला चालवायचा प्रयत्न करत होती. आईची पिल्लासाठी चाललेली धडपड तब्बल दोन तास चालली.... अभिनेत्री अपेक्षा मुंदरगी काशिकर यांनी ही दृश्यं आपल्या कॅमेरात टीपली आहेत.