Ashraf Ghani : काबूलमध्ये असतो तर रक्तपात झाला असता, अफगाणिस्तानचे राष्ट्रपती प्रथमच माध्यमांसमोर

Continues below advertisement

तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा घेतल्यानंतर अफगाणिस्तान सोडून गेलेले राष्ट्रपती अशरफ गनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर आलेत. यावेळी त्यांनी यूएईमधून अफगाणिस्तानच्या जनतेला संबोधित केलं. तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर काबूलमध्ये असतो तर रक्तपात झाला असता असं गनी यांनी म्हटलंय. तसंच देश सोडताना पैशांची बॅग घेऊन पळाल्याची माहिती अफवा असल्याचा दावाही गनी यांनी केलाय. तालिबान्यांसोबत बातचीत करुन कुठलाही मार्ग निघाला नसता. त्यामुळे अफगाणिस्तानला रक्तपातपासून वाचवण्यासाठी देश सोडल्याचं गनी यांनी म्हटलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram