America: Kabul बाॅम्बस्फोटांच्या सूत्रधारांवर अमेरिकेचा ड्रोन हल्ला, हेमंत महाजन यांची प्रतिक्रिया

अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेनं ड्रोन हल्ला करून काबूल विमानतळावर स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांना काही तासांच्या आत धडा शिकवला. स्फोटाचं षडयंत्र रचणाऱ्यांना मारल्याचा दावा अमेरिकेनं केलाय. काबूल विमानतळावर गुरुवारी आयसिस के या दहशतवादी संघटनेनं स्फोट घडवला आणि त्यात अमेरिकेच्या 13 सैनिकांसह 170 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर अमेरिकेनं काही तासांच्या आत अफगाणिस्तानातील नंगरहार प्रांतात ड्रोन हल्ला चढवला आणि स्फोटाचा डाव रचणाऱ्यांचा खात्मा केला. नंगरहार प्रांत पाकिस्तानच्या सीमेजवळ आहे. काबूलमध्ये आणखी एक स्फोट घडवला जाण्याची शक्यता अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेनं वर्तवली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola