Afghanistan Taliban Crisis: आम्ही कुणालाही धोका पोहचवणार नाही : Taliban PC
अफगाणिस्तान ताब्यात आल्यानंतर तालिबानने काल पहिली पत्रकार परिषद घेतली. कोणत्याही आंतरराष्ट्रीय दूतावास किंवा संस्थेला हानी पोहोचवणार नाही, अशी ग्वाही तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिदी यांनी दिली. त्यासोबतच तालिबान सरकारला आंतरराष्ट्रीय समुदायाने मान्यता दिली पाहिजे. अशी मागणीही त्यांनी केली. तसंच जबीहुल्ला मुजाहिदी यांनी लोकांना सुरक्षेचे आश्वासन दिलं आहे. यासोबतच अफगाण महिलांना शरिया कायद्याच्या अंतर्गत नोकरी करण्याची हमी तालिबाननं दिली असून महिलांनी सत्तेत सहभागी होण्यासाठी पुढे यावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे. तालिबान कोणावरही सूड उगवणार नसल्याचं म्हटलंय. शिवाय अफगाणिस्तानामुळे कोणत्याही देशाचं नुकसान होणार नसल्याचही तालिबान्यांकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे तालिबान त्यांची जागतिक प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचं यावरुन दिसून येतंय.