Afghanistan : काबूल बॉम्बस्फोटानं पुन्हा हादरलं, बॉम्बस्फोटात 19 ठार तर 50 पेक्षा जास्त जखमी
abp majha web team
Updated at:
02 Nov 2021 10:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKabul Twin Blasts: अफगाणिस्तानची राजधानी काबुमधील लष्करी रुग्णालयाजवळ दोन भीषण स्फोट (Military Hospital) झाल्याची घटना उघडकीस आलीय. या स्फोटमध्ये 19 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय. तर, 50 जण जखमी झालेत. पहिला स्फोट सरदार मोहम्मद दाऊद खान रुग्णालयासमोर झाला. दुसरा स्फोटही याच रुग्णालयाजवळच्या परिसरात झालाय. स्फोट क्षेत्रातून गोळीबाराचा आवाजही ऐकू आल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितलंय. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली असून मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.