Afghanistan मध्ये वर्गात मुला-मुलींमध्ये पडदा, शिक्षणाचं स्वरुप Taliban नं बदललं : ABP Majha
Continues below advertisement
Afghanistan Crises : तालिबानचं सरकार आल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये बरेच मोठे बदल झाले आहेत. अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर ताबा मिळवल्यानंतर 21 दिवसांनी आता तालिबान्यांनी पंजशीर प्रांतावरही ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. अफगाणिस्तानच्या इस्लामी अमीरातचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी दावा केला आहे की, आतापर्यंत पंजशीरमध्ये नॅशनल रेजिस्टेंस फ्रंटचे नेते अहमद मसूद यांचा ताबा होता. पंजशीरवरुन तालिबान आणि नॅशनल रेजिस्टेंस फ्रंट यांच्यात संघर्ष सुरु होता. यामध्ये दोन्ही बाजूनं शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
Continues below advertisement