Sanjay Raut : मराठी माणूस हरल्याबद्दल जे पेढे वाटतायत अशा गद्दारांना महाराष्ट्र माफ करणार नाही: राऊत

बेळगाव : बेळगाव महानगरपालिका निवडणुकीचा (Belgaum Municipal Corporation Election) निकाल आज घोषित झाला. या निकालात भाजपनं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे. एकहाती सत्ता काबिज करत बेळगाव महापालिकेवर कमळ फुलवलं आहे. भाजपनं महाराष्ट्र एकीकरण समितीचा धुव्वा उडवत सत्ता काबीज केली आहे. या निवडणुकीत भाजपनं 35 काँग्रेसनं 10, अपक्ष 8, महाराष्ट्र एकीकरण समिती 4 आणि एम आय एम एक असे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपाला जनतेने स्पष्ट बहुमताचा कौल देत सत्ता सोपवली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीला या निवडणुकीत धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे 32 सदस्य आधीच्या सभागृहात होते. तर कन्नड उर्दू गटाचे 36 सदस्य होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola