Afghanistan Crisis : अफगाणिस्तान : टेक ऑफ करताना चढलेली माणसं जमिनीवर कोसळली : ABP Majha

Continues below advertisement

काबुल : अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर तेथील परिस्थिती काही भयावह बनत आहे, हे दाखवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. नागरिक देश सोडून जाण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मिळेल त्या मार्गाने नागरिकांना देशातून म्हणजेच तालिबान्यांच्या तावडीतून बाहेर पडायचं आहे. रस्त्यांवर लोकांची गर्दी आहे. विमानतळावर विमानांच्या अवतीभोवती नागरिकांना गर्दी केलीय. अशातच विमानाला लटकून प्रवास करण्याच्या प्रयत्नात हवेतून खाली पडून काही जणांना मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. 

तालिबानने काबुलवर कब्जा मिळवताच अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडून पलायन करण्याचा निर्णय घेतला. आता तालिबान या दहशतवादी संघटनेनं अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनवर पूर्ण कब्जा मिळवला आहे. तालिबानचा कमांडर मुल्ला अब्दुल घनी ब्रार हा अफगाणिस्तानचा सत्ताधीश म्हणून काम करु शकतो.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram