Afghanistan Crisis : अफगाणिस्तानातून अमेरिकेचं सैन्य माघारी; राष्ट्राध्यक्ष बायडन म्हणाले...

Continues below advertisement

Afghanistan Crisis : अमेरिकेनं अफगाणिस्तानातून आपलं सैन्य पूर्णपणे मागे घेतलं आहे. यूएस जनरल केनेथ एफ मॅकेंजी यांनी यासंदर्भात घोषणा केली. ते म्हणाले की, अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी परतल्याची आणि अमेरिकन नागरिकांसह अफगाणी नागरिकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यासाठी सुरु केलेल्या लष्करी मोहिमेच्या शेवटाची घोषणा करतो. ते पुढे म्हणाले की, शेवटचं सी-17 विमान हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दुपारी 3 वाजून 29 मिनिटांनी रवाना करण्यात आलं. 

याव्यतिरिक्त अमेरिकेनं अफगाणिस्तानातून आपली राजकीय उपस्थितीही संपवली असून ती कतारमध्ये हलवण्यात आली आहे. न्यूज एजंसी एएफपीनं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन यांच्या हवाल्यानं ही माहिती दिली. ब्लिंकन म्हणाले की, अफगाणिस्तान सोडू इच्छित असलेल्या प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मदत करण्यास अमेरिका वचनबद्ध आहे.

अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याच्या घोषणेसोबतच जनरल केनेथ एफ मॅकेंजी म्हणाले की, "सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अतिरिक्त अमेरिकन नागरिक आणि अफगाणी नागरिकांसाठी राजकीय मिशन सुरु आहे." दरम्यान, अमेरिकेनं आपल्या सैनिकांना अफगाणिस्तानातून पूर्णपणे माघारी घेण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंतची अंतिम तारिख दिली होती. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram