Afghanistan crisis : Kabul विमानतळावर चेंगराचेंगरी, 7 अफगाण नागरिकांचा मृत्यू ABP Majha
Continues below advertisement
काबूलमध्ये अडकलेले शेकडो भारतीय आज मायदेशी परतले आहेत... १६८ जणांना घेऊन भारतीय वायुसेनेचं C-17 विमान गाझियाबादमधल्या हिंडन एअरबेसवर दाखल झालं. भारतीय वायुदलाच्या या मोहिमेमुळं फक्त भारतीयांचीच नव्हे, तर अनेक अफगाण नागरिकांची देखील तालिबान्यांच्या कचाट्यातून सुटका झाली आहे.. अनेक जण आपल्या लेकरा-बाळांसह आणि वृद्ध माता-पित्यांसह भारतात दाखल झाले आहेत.. विमानातून उतरताच अनेकांना अश्रू अनावर झाले.. दरम्यान अफगाणिस्तानातल्या दुशांबेमधून ७९ भारतीयांना घेऊन एअर इंडियाचं विमान सकाळी पाच वाजून बारा मिनिटांनी दिल्ली विमानतळावर दाखल झालं, तसंच विस्तारा आणि इंडिगो कंपनीच्या विमानांनी देखील अनेक भारतीय काबूलमधून मायदेशी परतले आहेत.
Continues below advertisement