5G : अमेरिकेतील विमानतळावर 5Gचा विमान सेवेला अडथळा, एअलाईन कंपन्यांचं राष्ट्राध्यक्षांना पत्र

आपण सर्वच 5G सेवेची वाट पाहतोय.. मात्र अमेरिकेत ५जी सेवा सुरु होताच पहिला साईड इफेक्ट समोर आलाय. अमेरिकेतल्या विमानतळांवर 5G इंटरनेट सेवा कालपासून सुरू झाल्यानं विमान सेवेत मोठा व्यत्यय निर्माण झालाय. एअर इंडियाकडून अमेरिका आणि भारतादरम्यान सुरू असलेल्या अनेक फेऱ्या तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आल्यात. अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या मतानुसार 5G लहरींमुळे विमानाचं अल्टीमीटर इंजिन आणि ब्रेक्स सिस्टीम्समध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. ज्यामुळे रनवेवर विमान उतरताना अपघात होण्याची शक्यता आहे. या सूचनेमुळे एअर इंडियानं विमानाच्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. एअर इंडियाप्रमाणे दुबईच्या एमिरेट्स एअरलाईन्सनंही उड्डाणं रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. अमेरिकेतल्या अनेक एअरलाईन्सनाही या निर्णयाचा फटका बसलाय. अनेक एअरलाईन्स कंपन्यांनी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना पत्र लिहून विमानसेवा रखडण्याची शक्यता असल्याचा इशाराही दिलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola