China : चीनमधील बँकांमध्ये ४६ हजार कोटींचा महाघोटाळा, चौकशीनंतर २३४ जणांना अटक
China : चीनमधील बँकांमध्ये ४६ हजार कोटींचा महाघोटाळा उघडकीस आलाय. या प्रकरणी चौकशीनंतर २३४ जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील बँकांमध्ये असलेल्या ठेवींवर जादा व्याज देण्याचं आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली.शूचांग शहरातील प्रशासकीय यंत्रणेनं दिलेल्यामाहितीनुसार लू यिवेई नावाच्या मास्टरमाईंडनं सहकाऱ्यांसोबत मिळून हेनानमधील चार बँकांवर अवैधरित्या कब्जा मिळवला होता. गुंतवणूकदारांना वार्षिक १३ ते १८ टक्के व्याज देण्याचं आश्वासन देत ही फसवणूक करण्यात आली. आरोपींनी अनहूई प्रांतातील शिनमिनशेंग ग्रामीण बँकेचा समावेश होता.तर गेल्या काही दिवसांपासून ठेवीदार बँकापर्यंत पोहचू नये, यासाठी सुरक्षा दल तैनात करण्यात आलेत.
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Top Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv ABP Maza MARATHI NEWS