पोहरादेवीच्या महंतांच्या विनंतीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार? राठोड राजीनामा देणार?
मुंबई : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव वाढला आहे. त्याता आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या सूचक ट्वीटमुळे चर्चांना उधाण आलं आहे. संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो ट्विटरवर शेअर करत राजधर्माची आठवण करुन दिली. मात्र त्यांचं हे ट्वीट कुणासाठी आहे, याची चर्चा आता रंगू लागली आहे.