कार्तिकी यात्रेला संचारबंदी नको अन्यथा येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकणार - वारकरी संप्रदाय

पंढरपूर : कोरोना संकटामुळे मार्चपासून कुलुपात बंद असलेल्या विठुरायाच्या मंदिराची दारे कार्तिकी यात्रेला उघडून कमीतकमी निर्बंध घालून यात्रा होऊ द्यावी, अशी मागणी वारकरी संप्रदायाच्या बैठकीत करण्यात आली. आषाढीप्रमाणे कार्तिकी यात्रेला संचारबंदी लागू न करता मर्यादित वारकऱ्यांना कोरोनाचे नियम पाळून यात्रेला येऊ द्यावे, प्रत्येक मठात 50 भाविकांना उतरण्यास परवानगी द्यावी. कार्तिकी एकादशीला सकाळी बारा वाजेपर्यंत वारकऱ्यांना सोशल डिस्टन्स पाळून प्रदक्षिणा करू द्यावी, अशी विनंती या प्रस्तावात केली जाणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola