Kailas Gorantyal | अजित पवारांच्या भेटीनंतर काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांची नाराजी दूर, गोरंट्याल का होते नाराज?
Continues below advertisement
जालना : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोननंतर काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी उपोषण रद्द केलं आहे. निधी वाटपाबाबत काँग्रेसच्या बाबतीत दुजाभाव होत असल्याचं सांगत पक्षाचे 11 आमदार उपोषणाला बसणार असल्याचा इशारा कैलास गोरंट्याल यांनी दिला होता. त्यानंतर अजित पवार यांनी कैलास गोरंट्याल यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. "आम्ही दुजाभाव करत नाही. परंतु यापुढे निधी वाटपाबाबत तुमचा प्राधान्याने विचार करु," असं आश्वासन अजित पवार यांनी कैलास गोरंट्याल यांना दिल्याचं समजतं. त्यानंतर गोरंट्याल यांनी समाधान व्यक्त करत उपोषण रद्द करत असल्याचं सांगितलं.
Continues below advertisement