Seven India Energy Management CEO| लॉकडाऊनमध्ये वाढीव वीज बिल का आलं? मीटर रिडींगमध्ये घोळ झालाय का?

Continues below advertisement

लॉकडाऊनच्या  काळात मोठ्या प्रमाणावर वाढीव वीज बिलाच्या तक्रारी ग्राहकांकडून येत होत्या. मात्र नक्की वाढीव बिल कशामुळे आले, त्यात मीटर रिडींगचा काही घोळ आहे का? अशा अनेक शंका व्यक्त केल्या जात होत्या. याबाबत आम्ही सेवेन इंडिया एनर्जी मॅनेजमेंटचे सीईओ प्रवीण दधिच  यांच्याशी बातचीत केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, लॉकडाऊनच्या चार महिन्यात बहुतांश लोक घरी होते, त्यामुळे नकळत मोठ्या प्रमाणावर विजेचा वापर झाला. मागील वर्षीच्या बिलाशी जर तुलना केली तर त्यांना हा फरक लक्षात येईल. ज्या ग्राहकांना याविषयी शंका आहे ते महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन स्वतःचा कंझ्युमर नंबर वापरून सर्व माहिती करून घेऊ शकतात. मीटर रिडींगची व्यवस्था यांत्रिक असल्यामुळे शक्यतो बिनचूक असते असाही त्यांचा दावा आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram