EXCLUSIVE | महाराष्ट्रात दोन महिन्यांत सत्तांतर होणार असा ठाम विश्वास रावसाहेब दानवेंना कशामुळे आहे?
विरोधकांना नेहमी कार्यकर्ते सोबत राहण्यासाठी सरकार पडणार असं म्हणावंच लागतं. कायम कार्यकर्त्यांना गाजर दाखवावं लागतं. शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी यांनी ही महाविकास आघाडी निर्माण केली आहे, यांचे आशीर्वाद आहे तोपर्यंत सरकार मजबूत आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते कराडमध्ये बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की, चंद्रकांतदादा पाटील यांना कुणी सांगितलं आम्हाला मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडली. आम्ही स्वप्नं पाडण्याचं काम करत नाही, आम्ही कृती करणारी माणसं आहोत, असं अजित पवार म्हणाले. 105 आमदार असताना सरकार बनवता आलं नाही हे त्याचं खरं दुखणं आहे, म्हणून सारख्या काट्या पेटवतात असा टोला देखील अजित पवारांनी लगावला.
Tags :
Maha Government Minister Raosaheb Danve Mahavikas Aghadi Raosaheb Danve Maharashtra Government BJP Shivsena Ncp Congress