आरोग्य कर्मचाऱ्यांचा लसीकरणाला प्रतिसाद का नाही? लस घेण्याबाबत टाळाटाळ का? लसीला का घाबरतायत लोक?
Corona Vaccination In Maharashtra : देशात कोरोना बळी जाण्यामध्ये ज्या राज्याचा देशात अव्वल क्रमांक आहे, त्यातील एक म्हणजे महाराष्ट्र. असं असतानाही राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोरोना लसीकरणाला प्रतिसाद मिळताना दिसत नाही. सर्वात चिंतेची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील सर्वाधिक बाधित असलेली शहरे, मोठ्या महानगरातले आरोग्य कर्मचारी लसीकरणापासून दूर पळताना दिसत आहेत. तर आदिवासी असलेला पालघर जिल्हा आणि तुलनेने मागासलेला उस्मानाबाद जिल्हा लसीकरणामध्ये अव्वल आहे. पालघर पहिल्या क्रमांकावर तर उस्मानाबाद दुसऱ्या क्रमांकावर आहे. आश्चर्याची बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या जयंत पाटील यांच्या सांगली जिल्ह्यामध्ये काल केवळ 0% लसीकरण झालं. कालची महाराष्ट्राची आकडेवारी जर आपण बघितली तर महाराष्ट्रातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणाकडे कशी पाठ फिरवली आहे हे आपल्या लक्षात येईल.
Tags :
VG Somani DCGI Covishield COVID Vaccine Vaccination Covid Vaccination Covaxin Bharat Biotech Corona Vaccine Corona Vaccination