Sugar Rates | उत्पादन वाढल्याने दर कमी होण्याची शक्यता, राज्यात साखरेचा महापूर
राज्यात यावर्षी साखरेचा महापूर आला आहे. साखर कारखान्यांची गोदामे भरून गेली आहेत. कांहीच दिवसात साखर कुठे ठेवायची असा प्रश्न पडू शकतो. गेल्या वर्षांची ३६ लाख टन साखर अधिक आता पर्यंत तयार झालेली ५२.४७ लाख टन साखर अधिक शिल्लक असलेल्या ४१२ लाख टन ऊसा पासून तयार होवू घातलेली साखर एवढी साखर असेल. या साखरेचे काय करायचे याचे सध्या तरी कोणाकडेच उत्तर नाही.