Gujarat Corona Test | गुजरातमध्ये खासगी लॅबमधील कोरोना टेस्ट का थांबवल्या? आकडा नियंत्रित ठेवण्यासाठी कमी टेस्ट?
गुजरातमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा नियंत्रित ठेवला जातोय की काय असा सवाल उपस्थित होतोय,कारण गेल्या काही दिवसांमध्ये राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयांमुळे खासगी लॅबमध्ये कोरोनाची चाचणी बंद करण्यात आली. त्यामुळे कोरोनाच्या चाचण्यांचं प्रमाण कमी झालंय, त्याचा थेट परिणाम कोरोनाग्रस्तांच्या संख्येवर होतोय. सरकारच्या याच भूमिकेवर उच्च न्यायालयानंही सरकारवर ताशेरे ओढले. खरंच गुजरातमध्ये रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी चाचण्या कमी केल्या जात आहेत का?