सिडनी कसोटीचं पारडं कुणाच्या बाजूने? शुभमन गिलला कुणाकडून शाबासकी? सिडनी कसोटी नाट्यमय वळणावर!
सिडनी : सिडनी कसोटीचा दुसरा दिवस दोन्ही संघांसाठी चांगला ठरला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने दोन विकेट्सच्या मोबदल्यात 96 धावा केल्या आहे. पहिल्या डावात भारतीय संघ ऑस्ट्रेलियापासून अजूनही 242 धावांनी पिछाडीवर आहे. खेळ संपला त्यावेळी चेतेश्वर पुजारा 9 आणि अजिंक्य रहाणे 5 धावांवर खेळत आहेत.