औषधांचा काळाबाजार, कोरोनाच्या संकटात रुग्णांची लूट कधी थांबणार? आरोग्य व्यवस्थेत कधी सुधारणा होणार?
Continues below advertisement
सोलापूर शहरात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन अहोरात्र प्रय़त्न करतंय मात्र दुसरीकडे कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होताना दिसत आहे. सोलापूर शहरात ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात चाचण्यांचे प्रमाण बरेच घटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. असे असले तरी बाधित रुग्ण आढळण्याचे कमी झालेले नाहीये. तर मृतांच्या संख्येत देखील कोणतेही घट झालेली नाहीये. त्यामुळे शहरात कोरोनाची परिस्थिती अद्याप ही चिंताजनकच आहे असे म्हणावे लागेल.
Continues below advertisement