Navratri Guidelines | नवरात्रीत गरबा, दांडिया खेळण्यास बंदी,नवरात्रौत्सवासाठी राज्य सरकारची नियमावली
नवरात्रौत्सव अवघ्या काही दिवसांवर आलाय, नवरात्रीत सर्वात मोठं आकर्षण ठरतं ते म्हणजे दांडिया, मात्र यंदा ते शक्य होणार नाहीए. दांडिया आणि गरबा खेळण्यास यावर्षी बंदी घातली गेली आहे आणि याचं कारण आहे कोरोना. आतापर्यंत सर्व सण ज्याप्रकारे साजरे केले गेले त्याचप्रमाणे दांडियासुद्धा साध्यापणाने साजरा करावं अशा सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. त्याबाबत नवी नियमावली सरकारने जाहीर केली आहे.