Shirdi Saibaba Temple | शिर्डीतील साई मंदिराच्या कळसाचं दर्शन घेण्यासाठी साईभक्त शिर्डीत, मंदिर कधी उघडणार भक्तांचा सवाल
देशात पाचव्या अनलॉक ची नवीन नियमावली जाहीर झाली आणि अनेक व्यवसायांना मुभा देण्यात आली मात्र मंदिरांचे दरवाजे अद्यापही बंद असल्याने भक्तांमधून नाराजी व्यक्त करण्यात येतेय. मंदिर बंद असले तरी इ पास ची अट रद्द झाल्यानंतर आता शिर्डीत कळसाच दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करत असून आरतीच्या वेळेला उन्हात बाहेर उभे राहून साईबाबांना साकडं घालतांना दिसतायत.