भंडाऱ्यात जादूटोण्याच्या संशयातून दोन कुटुंबातील वाद पेटला, मातीचे बाहुले आणि लिंबू टाकण्यावरून वाद
काही महिन्यापासून सोनी गावात हुमने आणि गजभिये या दोन कुटुंबात जादूटोण्याच्या संशयातून वाद सुरु असून 3 महिन्यांपूर्वीच पोलिसात हे प्रकरण आले असता पोलिसांनी चौकशी करून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पथकाला पाचारण करत वाद मिटविला होता. मात्र अंधश्रद्धाने झपाटलेल्या हुमने कुटुंबाने गजभिये परिवारातील महिलेने मातीचे बाहुले व लिंबू टाकण्यावरून वाद केला. त्यामुळे वाढता वाद लक्षात घेता पोलिसांनी हुमने यांच्या तक्रारी वरून उज्वला गजभिये, आकाश गजभिये, प्रदीप गजभिये यांच्या वर गुन्हा नोंद करत अटक केली आहे. कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त असून भंडारा पोलीस अधीक्षक यांनीही भेट दिली आली.