आतापर्यंत 15 हजार लोकांना लस, सर्वसामान्यांना लस कधी? मंत्री राजेश टोपेंकडून सर्व प्रश्नांची उत्तरं
जालना : सकाळपासून कोरोना लसीकरण कोणत्याही अडथळ्याविना पार पडलं आहे. लस घेतलेल्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान पाहायला मिळालं. लसीकरणाचा पहिला टप्पा तीन ते चार महिने चालेल, अशी माहिती एबीपी माझाच्या मुलाखतीत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते म्हणाले की, लसीकरणासाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसारच काम सुरू आहे. केंद्र शासनाच्या सूचना संपूर्ण राज्यासाठी बंधनकारक आहेत आणि त्यांच्या सूचनेचे स्वागत होत आहे. देशामध्ये लसीकरणाचा कार्यक्रम केंद्र शासनाच्या वतीने जात आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही चुकू नये एवढी काळजी घेतली आहे, असं ते म्हणाले.