#HathrasCase हाथरसमध्ये योगी सरकार काय दडवतंय? यूपी पोलिसांविरोधात 'एबीपी'चा सत्याग्रह
Continues below advertisement
हाथरस (उत्तर प्रदेश) : हाथरसमधील सामूहिक अत्याचार प्रकरणातील 19 वर्षीय पीडितेचा दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. पीडितेला न्याय देण्याच्या मागणीसाठी देशभर आंदोलन केली जात आहेत. माध्यमांना या गावात जाण्यासाठी प्रशासनाकडून बंदी घालण्यात येत आहे. या प्रशासनाच्या भूमिकेच्या विरोधात एबीपी न्यूजच्या रिपोर्टर प्रतिमा मिश्रा यांनी तिथंच ठिय्या आंदोलन सुरु केलंय. सध्या #ABPKoMatRoko हा हॅशटॅग ट्रेंडिंग आहे. एबीपी न्यूजच्या रिपोर्टर प्रतिमा मिश्राला रिपोर्टिंग करण्यापासून रोखलं गेलं. तिने तिथेच ठिय्या दिला आहे.
Continues below advertisement