FYJC Admission Online Process | अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कशी आहे? कसा भरावा ऑनलाईन अर्ज?
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचं पुन्हा एकदा सुधारीत वेळापत्रक जाहीर झाले असून 26 जुलै पासून विद्यार्थ्यांना लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळण्यास सुरुवात झाली. तर 1 ऑगस्टपासून विद्यार्थ्याला अकरावी ऑनलाइन प्रवेश अर्जाचा भाग 1 भरता येणार आहे. राज्यातील मुंबई महानगर, पुणे नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या विभागात अकरावीची प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. मात्र सदर प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी आणि पालकांना अद्याप पुरेशी जागृती झालेली नसल्याने या प्रवेश प्रक्रियामध्ये भाग 1 भरण्याची तारीख पुढे ढकलली आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार 26 जुलैपासून अर्जाचा भाग 1 भरायचा होता मात्र आता हा अर्ज 1 ऑगस्टपासून विद्यार्थी भरणार आहेत.
Tags :
College Admission FYJC Junior College Admission Lockdown College College Reopen Junior College