...तर खासगी वीज बिल कंपन्यांना झटका द्यावा लागेल; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
लॉकडाऊन काळात विजेच्या वाढीव बिलासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. कोरोना संकटात राज्यातील जनता, राजकीय पक्ष एकदिलाने सरकारच्या पाठीशी ठाम उभे राहिले, परंतु अशा विषयात जनता आणि मनसे गप्प बसेल अशी चुकीची समजूत सरकारने करुन घेऊ नये, असा सूचक इशाराच या पत्रातून देण्यात आला आहे.