Majha Vishesh | मंदिरं बंद म्हणून 'टाळी तोडा' योग्य? धर्मस्थळं खुलेकरणाचा मध्यम मार्ग काय?

Continues below advertisement
उस्मानाबाद : तुळजापुरात तुळजाभवानी मंदिरात कलम 144 म्हणजेच, जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कालपासून भाजप आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांच्या नेतृत्त्वात तुळजाभवानी मंदिर परिसरात वेबमुदत ठिय्या आंदोलन सुरु होतं. तसेच भाजप आध्यात्मिक आघाडीच्या आंदोलनाचा मंडपही प्रशासनानं काढला होता. परंतु, आता भाजपच्या आध्यात्मिक आघाडीच्या वतीने हे आंदोलन स्थिगित करण्यात आलं आहे. आमचा नवचंडीचा यज्ञ होवू दिला नाही. साधुचा तुम्हाला शाप लागेल.सर्व नियम पाळून आंदोलन करत होतो. आम्ही कुणालाही घाबरत नाही. पण भाविकांची गैरसोय होवू नये म्हणून आंदोलन स्थगित करत आहेत, असं भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी सांगितलं. मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी भाजप आध्यात्मिक आघाडी आग्रही आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram