पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं? माजी मंत्री, शिवसेना आमदार भास्कर जाधवांचं धक्कादायक वक्तव्य
रत्नागिरी : माजी मंत्री आणि शिवसेनेचे गुहागर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं? पोलीस देखील हफ्त घेत नाहीत का? असं धक्कादायक विधान केले आहे. गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. भास्कर जाधवांचं हे विधान 8 नोव्हेंबर 2020 रोजीचं आहे. सध्या त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ व्हायरल देखील होत आहे. तसेच फक्त दोन गोष्टींसाठी मला फोन करू नका. पहिली म्हणजे मुलींची छेडछाड आणि दुसरी म्हणजे चोरी. 'बाकी कोणत्याही गोष्टीला तुम्ही घाबरू नका, भास्कर जाधव तुमच्या पाठीशी आहे', अशी पुष्टी देखील यावेळी जाधव जोडली आहे. यावेळी बोलताना त्यांनी भाजप नगरसेवकावर कारवाई होत नाही. पण, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर कारवाई होते?