Sarathi Meeting | सारथीच्या बैठकीत मानापमान नाट्य, अशी रंगली 'सारथी' संस्थेची बैठक! काय घडलं बैठकीत?

सारथी संस्थेच्या समस्या सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक महत्वाची बैठक बोलवली होती. यात सारथी संस्थेला 8 कोटींचा निधी देऊन सर्व वादाला पुर्णविराम दिला. महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून सारथी संस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मराठा समाजाकडून करण्यात आला होता. तसेच खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी देखील सारथीचा मुद्दा लावून धरला होता. त्यामुळे आज अजित पवारांनी तातडीनं साराथीसाठी बैठक बोलवली होती. या बैठकीला अजित पवारांसह खासदार संभाजीराजे, मंत्री विजय वड्डेटीवार आणि नवाब मलिक उपस्थित होते. यादरम्यान दोन वेगवेगळया बैठका झाल्या.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola