Chandrakant Patil on Raut | 'सामना'तील रोखठोकसाठी चंद्रकांत पाटलांनी संजय राऊत यांना सुचवले मुद्दे
शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून भाजपवर सातत्याने टीकेची झोड उठवणाऱ्या शिवसेना नेते संजय राऊत यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विटवरवरून आव्हान दिले आहे. सरकारमधील विसंवाद आणि वादावर बोट ठेवत पाटील यांनी राऊत यांना टोला लगावला आहे. बदलीवरून झालेला वाद, नगरसेवक फोडाफोडीवरून झालेलं राजकारण, ठाकरे सरकारचा कारभार, शेतकरी कर्जमाफी आणि सदोष बियाणांचा पुरवठा असे विषय पाटील यांनी सामनातील रोखठोकसाठी राऊत यांना सुचवले आहेत.