WEB EXCLUISIVE ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना काय शिक्षा होऊ शकते? LAWYER PRASHANT BHUSHAN CASE

नवी दिल्ली : ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने दोषी ठरवलं आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे हे नागपूरमधील राजभवनात दुचाकीवर स्वार झाल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. त्यावर प्रशांत भूषण यांनी टिप्पणी केली होती. प्रशांत भूषण यांच्या ट्वीटची दखल घेत सुप्रीम कोर्टाने त्यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस बजावली होती. न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola