Parth Pawar | सिल्व्हर ओकवर पार्थ पवारांची फक्त सुप्रिया सुळेंशीच चर्चा, शरद पवारांनी पार्थशी बोलणं का टाळलं?
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याविरोधात कठोर भूमिका घेतली. यानंतर आता पार्थ पवार कुटुंबाशी चर्चा करणार असं ठरलं होतं. पार्थ पवार आपले काका श्रीनिवास पवार, अभिजित पवार जयंत पवार तसंच सर्व आत्यांशी बोलून आपली भूमिका आणि निर्णय घेणार असं ठरलं होतं. या भेटीनंतर कुणीही नाराज नाही असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं.