पश्चिम बंगालच्या भाजप नेत्या पामेला गोस्वामींना 100 ग्रॅम कोकेनसह अटक, राजकीय ड्रग्ज प्रकरणानं खळबळ
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातच आता एक ड्रग्ज प्रकरण समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. पश्चिम बंगालमधील भाजपा युवा मोर्चाच्या नेत्या पामेला गोस्वामी आणि त्यांचे जवळचे मित्र प्रोबिर डे ला दक्षिण कोलकाताच्या न्यू अलीपूरमधून 100 ग्राम कोकेनसोबत अटक करण्यात आलं आहे.
रस्त्यावर गाड्यांची तपासणी सुरू असताना भाजपा युवा मोर्चाच्या नेत्या पामेला गोस्वामी यांच्या कारमधून लाखो रुपयांचा अवैध कोकेन पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पामेला गोस्वामी आणि त्यांचे जवळचे मित्र प्रोबिर डेला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.